रोम : इटलीमधील सर्दीनिया प्रांतातील पेरदेसफेगु या गावाची लोकसंख्या फक्त 1740 आहे. पण तरीही या गावामध्ये शतायुषी लोकांची संख्या जास्त आहे. या छोट्या गावांमध्ये 100 पेक्षा जास्त वय असणारे आठ लोक आहेत तर शंभर नंतर मृत्यू झालेल्यांची संख्याही खूप आहे. यावर्षी पाच जणांनी वयाची शंभरी पार केली आहे.
येत्या 2 वर्षांच्या कालावधी आणखी दहा लोक शतायु होणार आहेत. या गावात वाढदिवस साजरा करत असताना तब्बल शंभर मेणबत्त्याची व्यवस्था करावी लागते. सार्दिनया प्रांत जगातील अशा पाच प्रदेशांपैकी आहे. जेथे 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची संख्या सर्वात अधिक आहे. या प्रांतात 534 लोकांचे वय 100 पेक्षा जास्त आहे.
गेल्या काही वर्षामध्ये वयाची शंभरी गाठण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 2009 मध्ये या देशांमध्ये शतायुषी लोकांची संख्या अकरा हजार होती. 2019 मध्ये ती वाढून 14456 झाली आणि आता 2021 मध्ये हा आकडा 17935 एवढा मोठा आहे. या प्रांतातील पॅरलेसपोगो या गावाचे वैशिष्ट्य असे आहे की तेथे शंभरी पार केलेला लोकांची जी संख्या आहे. ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा 13 पट जास्त आहे.
कडलियारी विद्यापीठातील लोकसंख्या तज्ञ प्राध्यापक लुईसा सलरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रदेशातील चांगली हवा आणि योग्य भोजन यामुळे या भागातील लोकांना शतायुषी आयुष्य जगता येते. या गावांमधील लोकांना वाचनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची मोठी आवड असल्यामुळेच त्यांचे आयुष्य वाढले असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. 80 वर्षे वयाचा पत्रकार मेलीस संमेलनाचे आयोजन करतो. ते यशस्वी करण्यासाठी वयाची शंभरी पार केलेल्या सर्व वृद्धांचा पुढाकार मोठा असतो. महत्वाची बाब म्हणजे हे सर्व वृद्ध आपापल्या घरातच राहतात. या गावांमध्ये कोठेही वृद्धाश्रम नाही.