पुणे -करोनावरील कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांना एकत्रित करून देण्याचे परिणाम अधिक चांगले असल्याचे दि इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे. दोन्ही लसींचा वापर केवळ सुरक्षितच नाही तर अधिक परिणामकारक असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या दोन लसींना भारतात सर्वात आधी आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली.
देशात याच लसींचा सर्वाधिक वापर होत आहे. या दोन्ही लसींच्या 50 कोटी 62 लाख मात्रा देशात शनिवारपर्यंत देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविववारी सांगितले.
शनिवारी केवळ एका दिवसांत लसीच्या 50 लाख मात्रा देण्यात आल्या. 18 ते 44 वयोगटातील 27 लाख 55 हजार 447 जणांना पहिला डोस तर पाच लाख आठ हजार 616 जणांना दुसरी
मात्रा देण्यात आली. देशातील एकूण 17 कोटी 54 लाख 73 हजार जणांना पहिली मात्रा दिली आहे. तर एक कोटी 18 लाख आठ हजार 368 जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.