पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिस बरी पार्क ‘ महर्षी नगर प्रभागातील विविध बचत गटांतील महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले .
तसेच प्रभागातील रिक्षाचालकांना गॅस कूपनचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी मा . शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रभागात वृक्षारोपण केले तसेच बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणाऱ्या कोवीड योद्धयांचा सन्मान केला त्याच प्रमाणे आयुष्य मान भारत योजनेअंतर्गत प्रभागातील नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले.
या प्रसंगी आशिष शेलार यांनी उपस्थितांना प्रबोधन करताना म्हटले की भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता समाजसेवेचे व्रत घेऊन बेभान पणे कार्य करत आहे . मा देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्रीनाथजी भिमाले यांनी गोरगरिबांसाठी अतिशय उपयुक्त कार्यक्रम राबविला आहे . वास्ताविक पहाता एवढी लोकांची गर्दी म्हणजे भिमालेवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे असेच प्रेम सर्वांचे राहू दया. महिलांना सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपक्रम राबविल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार सुनिल कांबळे भाजपा पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश जी पांडे उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे माजी नगरसेविका वंदना भिमाले’ इ उपस्थित होते पुणे महानगर पालिकेचे सहायक आरोग्य प्रमूख डॉ . संजीव वावरे , डॉ सूर्यकांत देवकर डॉ . अमित उदवंत , राजेश दिघे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे ‘ मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक ( गुन्हे ) सविता ढमढेरे इ चा कोवीड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला . , या प्रसंगी, गणेश शेरला ‘ रमेश बिबवे ‘ चेतन चावीर , सुशिल लोंढे सतीश काळे , मानव ओसवाल इ उपस्थित होते.