Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी अन् विरोधी पक्षाचे लोक एकमेकांवर चिखलफेक करत मतदारांना आपल्या पारड्यात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता भाजपने एका उपरोधिक कवितेच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्या तुझ्या गळा, माझ्या गळा… या कवितेचे विडंबन करून महाविकास आघाडीचा चिमटा काढला आहे. शेलार यांनी आपली ही कविता ट्विट केली आहे. त्यात मविआचे रखडलेले जागावाटप, वंचितने ऐनवेळी दिलेला दगा या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते तुझ्या गळा माझा गळा करत एकमेकांचे गळे पकडत आहेत. काँग्रेसने तर ठाकरे गटाविरोधात मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे. सांगली साताऱ्यात कोण लढणार हे अद्याप ठरले नाही. । Lok Sabha Election 2024 । Ashish Shelar
वंचितवर काँग्रेस व ठाकरे गट आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आजही ईशान्य मुंबईतील आपला उमेदवार आजी आहे की माजी हे कळत नाही.
म्हणून हे एकमेकांचा गळा पकडणारे हे लोक महाराष्ट्र व देशाचे काय भले करणार? असा सवाल शेलार यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. । Lok Sabha Election 2024 । Ashish Shelar