मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यावर्षी विश्वविक्रमी दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात व राज्यात करोनाचे सावट असल्याकारणाने अनेक सण समारंभावर निर्बंध घालण्यात आले आहे. करोनामुळे मागिलवर्षी दहिहंडी उत्सवावर निर्बंध लावण्यात आले होते. मत्रा मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या सोहळ्यात येऊन मी नाचणार अशी घोषणा प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रविण तरडे याने केली आहे.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fabhijitpanse1972%2Fposts%2F10227027848666168&show_text=true&width=500″ width=”500″ height=”474″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share”></iframe>
“विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार” अशी फेसबुक पोस्ट मनसे नेते अभिजित पानसे यांनी मोठी घोषणा केली. या फेसबुक पोस्टला प्रविण तरडेने “100 टक्के नाचायला येणार” अशी कमेंट केली आहे. यावरुन प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यात करोनाचा धोका अजूनही संपला नाही. असे असताना मनसे दहीहंडी सोहळा कसा साजरा करण्यार याबाबत अद्याप सर्वांच्या मनात शंका आहे. तसेच प्रशासनाकडून दहिहंदी संदर्भात कोणत्याही सुचना आल्या नाहीत.