सना : येमेन हा देश नेहमीच दहशतवाद आणि हिंसाचार यासाठी प्रसिद्ध असला तरी या देशातील एका गावामध्ये असलेला एक नरकाचे प्रवेशद्वार या नावाने ओळखला जाणारा खड्डा वैज्ञानिकांना ही चक्रावून टाकत आहे.
वाळवंटातील एका प्रदेशांमध्ये एका विहिरीसारखा हा खोल खड्डा असून हा खड्डा म्हणजे नरकाचे प्रवेशद्वार असल्याचे मानले जात आहे. या खड्ड्याच्या खाली सैतानाला कैदेत ठेवले जात असावे अशी मान्यता आहे.
तीस मीटर रुंद आणि शंभर ते 250 मीटर खोल असलेल्या या खड्ड्यातून येणारा दुर्गंध पाहता या ठिकाणी अशा काही घटना घडल्या असाव्यात याला पुष्टी मिळत आहे. येमेनमधील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या खड्ड्याच्या खाली काय आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नाही. पण जिऑलॉजिकल सर्व्हे च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा खड्डा खूपच खोल असून आतल्या बाजूला ऑक्सिजनची पातळी खूपच कमी आहे.
खड्ड्यात 50 मीटरपर्यंत खाली उतरवण्यात आले आहे. त्यानंतर संशोधकांना तिथे अतिशय वेगळा वास आल्यामुळे त्यांनी खाली उतरण्याची मोहिम रद्द केली. या खड्ड्यात खूप खालपर्यंत प्रकाशही पोचत नसल्यामुळे फोटो काढणेही अवघड झाले आहे. हा खड्डा खूपच पुरातन असल्यामुळे त्याचे योग्य संशोधन केले जावे अशी तज्ज्ञांची मागणी आहे. या खड्ड्यांमध्ये भुते रहात असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये असल्यामुळे वाळवंटातील या प्रदेशामध्ये स्थानिक नागरिक अजिबात फिरकतही नाहीत.