अंकारा : तुर्कस्तानातील एका जुन्या मंदिरात खोदकाम सुरू असताना पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांना एक जुना नकाशा आणि काही दस्तावेज सापडला असून या नकाशात ब्रह्मांडाचे चित्रमय दर्शन होताना दिसत आहे.
या नकाशाचे वय 3200 वर्षापेक्षा जास्त असू शकते दगडावर कोरण्यात आलेल्या या आकृतीमध्ये विविध प्रकारचे 90 प्राणी शैतान आणि भगवान यांच्या मूर्ती खोदण्यात आल्या आहेत. या मंदिराच्या एका भिंतीवर सूर्य देवता आणि तुफान म्हणजेच वायू देवता यांच्याही मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
या नकाशामध्ये देवांना सर्वात वर ठेवण्यात आले असून खालच्या पातळीवर माणूस आणि इतर समाज घटक दाखवण्यात आले आहेत. या मंदिराच्या एका भिंतीवर चंद्राच्या विविध कला ही दाखवण्यात आल्या आहेत. या मंदिरातील एका पेंटिंगवर अंडरवर्ल्ड म्हणजेच पाताळबाबतही काही माहिती देण्यात आली आहे.
या मंदिराचा अभ्यास करणाऱ्या एका संशोधकाच्या माहितीप्रमाणे या मंदिरात सापडलेल्या विविध आकृती जुनी दिनदर्शिका आणि काही नकाशे यांचा अभ्यास करता या सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्मांडाचे एकत्रित स्वरूप असावे कारण या चित्रांमध्ये स्थिर अशी पृथ्वी आकाश आणि पाताळ या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. खोदकामात सापडलेला हा नकाशा पंचांग आणि दिनदर्शिका एवढा गुंतागुंतीच्या आहेत की त्याचा अभ्यास करण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो.