मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात शेकडो कार्यकर्त्यांच चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर – कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी आज शेकडो कार्यकर्त्यांनी ताराराणी पुतळा चौकात अर्धा तास चक्का जाम आंदोलन केले.

यावेळी एक मराठा लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला… आजच्या चक्काजाम आंदोलनात शाहू जनक घराण्याचे वारसदार समरजीत सिंह घाटगे हे सहभागी झाले होते .त्यामुळे आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.

स्वतः समरजित घाटगे यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भगवे टोपे आणि भगवे झेंडे घेऊन या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलकांच्या हातातील फलक हे विशेष लक्षवेधी होते. महिला आंदोलकांचा सहभागही ही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. जवळपास अर्धा तास सुरु असणाऱ्या या चक्काजाम आंदोलनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.