मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय.
हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून केला जातो.
तर याच शिवस्वराज्य दिनाला ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते हसन मुश्रीफ चांगलेच आक्रमक झाले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचे धाडस या राज्यात कोण करू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे.
तसेच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले’. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.