जुन्नर -जुन्नर तालुक्यात शुक्रवारी 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 15 हजार 520 झाली आहे.
तर 14 हजार 199 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 537 रुग्णांचा मृत्यू झाला असून 784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नारायणगाव येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळून आले आहेत.
वारूळवाडी 4, खानगाव 3, बेल्हे, धालेवाडी प्रत्येकी 2, आळे, आळेफाटा, पाडळी, गुंजाळवाडी बेल्हे, खुबी, शिरोली तर्फे आळे, हिवरे बुद्रुक, ओतूर, तेजेवाडी, पिंपळवंडी, राजुरी, शिरोली बुद्रुक, वडगाव सहाणी, पारुंडे, काटेडे व जुन्नर शहर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.