करोनाच्या साथीमुळे सगळे सिनेमे ओटीटीवर रिलीज व्हायला लागले आहेत. त्यात आता ‘हंगामा 2″चीही भर पडली आहे.
डिस्ने प्लस आणि हॉटस्टारला या सिनेमाचे हक्क 30 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाइट हक्कांचा समावेश नाही. याशिवाय टीव्ही प्रिमियरच्या हक्कांची एकूण रक्कम समजू शकलेली नाही.
ही रक्कम अंदाजे 36 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. “हंगामा 2′ ओटीटीवर कधी रिलीज होणार हे देखील समजू शकलेले नाही.
निर्मात्यांकडून अद्याप या व्यवहारावर शिक्कामोर्तब केले गेलेले नाही. “हंगामा 2′ एक हलकीफुलकी फिल्म आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.
या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल, आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि टिकू तलसानिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.
याशिवाय अक्षय खन्नाही छोट्या भूमिकेत दिसणार आहे. शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनंतर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. परेश रावल आणि शिल्पा शेट्टीची जोडी बघायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.