मुंबई – एकता कपूरच्या नागिन या मालिकेतील अभिनेता पर्ल वी पुरी याला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. अभिनेत्या विरोधात एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.
पर्ल विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या माहिलेचे अद्याप नाव समोर आलेले नाही. किंवा ती नेमकी आहे तरी कोण? याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. व लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
अभिनेता पर्ल वी पुरी हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत ‘बेपनाह प्यार’, ‘ब्रह्मराक्षस 2′,’ नागिन 3′, ‘नागार्जुन एक योद्धा’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही काळात तो नागिन या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत होता. सोशल मीडियावर देखील त्याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.