पुणे -शहरातील नव्या करोना बाधितांची वाढ बऱ्यापैकी आटोक्यात येत असून, मंगळवारी 2 हजार 892 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 16 हजार 523 पर्यंत कमी झाली आहे. दिवसभरात नवीन 1 हजार 21 रुग्णांची वाढ झाली.
तर, पुण्यातील 46 जणांसह 68 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ऍक्टिव्ह रुग्णांपैकी 1 हजार 364 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 5 हजार 10 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दरम्यान आतापर्यंत 4 लाख 61 हजार 8 पुणेकरांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 4 लाख 36 हजार 690 जण बरे झाले आहेत. तर 7 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे.