मंदिरा बेदी 49 वर्षांची झाली तरी आपल्या फिटनेसची खूप चांगली काळजी घेते आहे. आपल्या फिटनेस वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ ती अधुनमधून सोशल मीडियावर अपलोड करत असते. तसाच एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
त्यामध्ये ती जिममध्ये जबरदस्त वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये ती बॅक बेंड योगा म्हणजेच धनुरासन करताना दिसते आहे. तिच्या या लवचिक आसन करण्यावर तिच्या फॅन्सनी कॉमेंटही भरपूर केल्या आहेत. एका फॅनने “माझी ऑक्सिजन लेव्हल वाढली.’ अशी कॉमेंट केली आहे.
View this post on Instagram
आणखी एकाने “सुपरफिट’तर दुसऱ्याने “परफेक्ट’ म्हणून मंदिराचे कौतुक केले आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये मंदिराने शिर्षासन केल्याचे दिसते आहे. असे शिर्षासन केल्यामुळे आपली सगळी चिंता दूर होते. मन शांत होते.
View this post on Instagram
एरवी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करावे, असेही मंदिराने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 1994 मधील “शांति’ ही सिरियल सर्वात जास्त यशस्वी ठरली होती.
View this post on Instagram
त्यानंतर दुश्मन, क्योंकी सांस भी कभी बहू थी या सिरियल्स व्यतिरिक्त “दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ सारख्या सिनेमामध्येही तिने काम केले आहे.
View this post on Instagram