न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका सुपर मार्केटमध्ये अज्ञाताकडून केलेल्या गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या गोळीबारात एका पोलिसासह दहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील कोलोराडोमध्ये असलेल्या बोल्डर येथील मार्केटमध्ये हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत गोळीबार करणारा आरोपीही जखमी झाला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बोल्डरमधील टेबल मेसा परिसरात असलेल्या किंग सुपर्स ग्रोसरी स्टोरमध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सुपर मार्केटमध्ये हिंसा घडल्याची माहिती आम्हाला मिळाली. मात्र, कोणत्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला, याची माहितीबद्दल कळलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बोल्डर पोलीस विभागाचे प्रमुख कमांडर केरी यामगुची यांनी या घटनेविषयी अधिकची माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, नक्की किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे अजून कळू शकलेलं नाही. या घटनेत अनेक लोक मरण पावले आहेत आणि दुःखद बाब म्हणजे मृतांमध्ये एक बोल्डरमधील पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे,” असे यामगुची यांनी सांगितले.
#UPDATE | United States: Police say 'multiple' people including a police officer have lost their lives in the shooting at a supermarket in Boulder, Colorado.
"A suspect is in custody. He was injured and is being treated for his injury at a hospital," an officer says. https://t.co/Mq6syeLoSA pic.twitter.com/d5xHi6SDdX
— ANI (@ANI) March 23, 2021
घटनेत मरण पावलेल्यांची संख्या नंतर सांगितली जाईल, असे बोल्डरच्या प्रशासनाने म्हटले आहे. तर काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले असल्याचे म्हटले आहे. “गोळीबाराच्या ठिकाणाहून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रक्तपात झालेल्या ठिकाणी ही व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली, अशी माहिती यामगुची यांनी दिली. त्यांनी या व्यक्तीविषयी अधिकची माहिती देण्याचे टाळले .
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य प्रसारित केली. एक शर्ट न घातलेला, दाढी वाढवलेला, बॉक्सर शॉर्टस आणि हातात हातकड्या घातलेल्या व्यक्तीला दूर घेऊन जाताना दिसत आहे. त्याला स्ट्रेचरवर ठेवलं गेलं आणि नंतर रुग्णवाहिकेत नेण्यात आलं. त्या व्यक्तीचे पाय रक्ताने माखलेले होते आणि तो लंगडत चालत होता, असे दिसत आहे.