कोल्हापूर – गावठी बॉंम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा गावठी बॉम्ब पोलिसांनी वेळीच निकामी केल्याने मोठा अर्नथ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर शहरातील एक रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी अज्ञाताने रुग्णालयाच्या परिसरात गावठी बॉम्ब प्लान्ट केला होता. याच परिसरात विस्फोटासाठी लागणारे पुरक साहित्य दोन दिवसांपासून एका गोणीमध्ये पडून होते. हा प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वेळीच उघडकीस आला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना सूत्र हालवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी गावठी बॉम्ब निकामी केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जयसिंगपूरसारख्या शहरात गावठी बॉम्बच्या मदतीने थेट रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तपसातून लकवरच या प्रकरणाशी निगडीत बाबी समोर येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.