मुंबई – देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुद ही ओळख देशात निर्माण करणारे सोनू सुद यांनी करोनाच्या काळात अनेक गरजुंना मदत केली आहे. कोरोना काळात मुले पालकांकडे मोबाईल मागत होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पालक हतबल होते. अशा मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत असो वा देशातील मजुरांना लॉकडाऊनच्या काळात केलेली मदत असो नेहमीच सोनू सूद पुढे आला आहे.
नया साल, नई उम्मीदें
नई नौकरी के अवसर….
और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम।
प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर।
आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें
App Link: https://t.co/GMX1RW36s5#AbIndiaBanegaKaamyaab #GoodWorker #NaukriPaanaHuaAasaan pic.twitter.com/yV6XTZ5RtD— sonu sood (@SonuSood) March 14, 2021
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली आहे. गरजू लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही.
आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे. त्याने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. यासह सोनूने या अॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अॅपद्वारे 10 कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड खूश झाले आहेत.
काय आहे सोनू सूद याचे ट्विट
“नवीन वर्ष…. नवीन स्वप्नं… नवीन नोकरीच्या संधी… आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत… गुडवर्कर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमचे भविष्य उज्जवल करा…” असं सोनूने ट्विटमध्ये म्हटलं आहे.