मुंबई – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याचं यंदाचं 93 वे वर्ष आहे.
यंदा ऑस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारतातून मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली गेली होती. आता मात्र ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘जल्लीकट्टू’ हा केरळचा एक पारंपरिक खेळ आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ‘जल्लीकट्टू’ या वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते. आणि त्यानंतर बैलाला पडण्यामागचे प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
दरम्यान, ऑस्करच्या शर्यतीत नटखट, शेमलेस, सुराराई पोट्रू हे चित्रपटही सामिल होते. यामधील सुराराई पोट्रू हा चित्रपट अकॅडेमी स्क्रीनिंग रुममध्ये अद्याप आहे. हा चित्रपट बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट डायरेक्टर, रायटर आणि ओरिजनल स्कोर कॅटेटगरीमध्ये आपली दावेदारी सांगेल. या वर होणाऱ्या अंतिम मतदानानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.