केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरची मोठी कारवाई; बंद केली ‘ती’ ५०० खाती

नवी दिल्ली – पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांशी संबंधीत असलेली खाती ट्विटरने बंद करावीत.  तसेच, आमच्या सुचनेनुसार ट्विटरने कारवाई केली नाही तर ट्विटरलाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही सरकारने दिला होता. यानंतर ट्विटरने या खात्यांवर कारवाई केली आहे. 

काही ट्विटर खात्यांवरून भारतातील शेतकरी आंदोलनाविषयी बदनामाची मोहीम राबवली जात आहे. त्यातून भारताच्या सार्वजनिक शांततेला धोका पोहचत आहे, असे केंद्र सरकारने म्हंटले होते. यानंतर ट्विटरने संबंधित खात्यांवर कारवाई केली असून ते म्हणाले कि, भारत सरकारच्या निर्देशानुसार केवळ भारतातच काही अकाउंट बंद करण्यात आली आहेत. तर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि माध्यमांचे ट्विटर हॅण्डल ब्लॉक केलेले नाही. कारण असे केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल.

तसेच, ते आपल्या वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी भारतीय कायद्यांच्या पर्यायांवर विचार करत आहे, असेही ट्विटरने सांगितले आहे.

चुकीच्या हॅशटॅग ट्रेंडिंगपासून रोखण्यासह आणि शोध घेताना धोकादायक कंटेन्ट शिफारस न करण्यासाठी पावले उचलली आहेत. ट्विटरने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयालाही या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशांनुसार 500 पेक्षा जास्त खात्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्यास खाते कायमचे बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे, ट्विटरने स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.