– भुजंगराव दाभाडे
भोर – भोर शहरासह 118 गावांचा भार असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये रिक्त पदांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. या स्टेशनमध्ये 22 जण कार्यरत आहेत. त्यापैकी दररोज दहा ते बारा कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे बारा जणांवर शहरासह कार्यक्षेत्रातील गावांचा अतिरिक्त ताण पडला आहे. गेल्या आठवड्यात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत.
त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत अधिकाऱ्यांनी भोरचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रिक्त पदाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे भोर तालुक्यातील गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोडी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
भोर तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात एकूण 247 गावांसह वाड्या- वस्त्यांचा समावेश आहे. भोर शहरातील पोलीस स्टेशनच्या अंकित शहर आणि 118 गावे येतात. पोलीस स्टेशनमध्ये एकूण 22 जण कार्यरत आहेत. मंजूर पदे ही 54 आहेत. प्रत्यक्षात 22 अधिकारी, कर्मचारी अवाढव्य गावांचा कारभार हाकत आहेत. यामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, जमादार, हवालदार, शिपाई, पोलीस नाईक आदींचा समावेश आहे.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा, साप्ताहिक सुट्टी वगळता फक्त 10 ते 11 कर्मचारी कामावर हजर असतात. विशेषत: भोर शहराची लोकसंख्या 25 हजारांवर आहे. त्याचबरोबर 118 गावांवर करडी नजर ठेवावी लागत आहे. भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीन बीट आहेत. यात पसुरे, हिर्डोशी, आंबोर्डीचा समावेश असून दोन औट पोस्ट आहेत. या गावांचा डोलारा पेलण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार 54 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु 32 पदे रिक्त आहेत.
त्यासाठी पोलीस निरीक्षक राजू मोरे हे गेल्या 20 महिन्यांपासून शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे ग्रामीण पोलीस दलाकडे मागणी केली आहे. परंतु रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कायदा- सुव्यवस्थेची स्वास्थ्यपत्रिका बिघडत चालली आहे.
भोर तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात एकूण 247 गावांसह वाड्या- वस्त्यांचा समावेश आहे. भोर शहरातील पोलीस स्टेशनच्या अंकित शहर आणि 118 गावे येतात. पोलीस स्टेशनमध्ये एकूण 22 जण कार्यरत आहेत. मंजूर पदे ही 54 आहेत. प्रत्यक्षात 22 अधिकारी, कर्मचारी अवाढव्य गावांचा कारभार हाकत आहेत. यामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, जमादार, हवालदार, शिपाई, पोलीस नाईक आदींचा समावेश आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा, साप्ताहिक सुट्टी वगळता फक्त 10 ते 11 कर्मचारी कामावर हजर असतात. विशेषत: भोर शहराची लोकसंख्या 25 हजारांवर आहे.
त्याचबरोबर 118 गावांवर करडी नजर ठेवावी लागत आहे. भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीन बीट आहेत. यात पसुरे, हिर्डोशी, आंबोर्डीचा समावेश असून दोन औट पोस्ट आहेत. या गावांचा डोलारा पेलण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार 54 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु 32 पदे रिक्त आहेत. त्यासाठी पोलीस निरीक्षक राजू मोरे हे गेल्या 20 महिन्यांपासून शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे ग्रामीण पोलीस दलाकडे मागणी केली आहे. परंतु रिक्त पदांचा
प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कायदा- सुव्यवस्थेची स्वास्थ्यपत्रिका बिघडत चालली आहे.
गेल्या आठवडाभरात तीन घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्या भोर शहरासह परिसरात झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची तोकडी संख्या आणि गुन्ह्यांचे जादा प्रमाण विषमता दर्शविणारे ठरले आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरली नाही तर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत.
राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 97 गावांचा समावेश आहे. सातारा महामार्गावरील या ठाण्यासाठी पोलिसांची जादा कुमक आहे. राजगडसाठी 62 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तर भोर शहरासह 118 गावांसाठी 22 अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनातील रिक्त पदाचा आणि कार्यरत पदांबाबत विरोधाभास दर्शविणारे ठरले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
गेल्या अनेक वर्षांची मागणी गृहविभागाकडून बासनात गुंडाळली आहे काय, असा संतप्त सूर उमटत आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा, स्मरणपत्रे धाडली तरी संबंधित प्रशासन निद्रिस्त
बनले आहे.
भोर पोलीस स्टेशनच न्यायाच्या प्रतीक्षेत
भोर पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाढता ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असताना त्यांना कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बऱ्याचवेळा घरगुती कारणांसाठी रजा अथवा सुट्टी घेण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी मानसिक दडपणाखाली काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी भोरचे पोलीस स्टेशन न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे.
भोर पोलीस स्टेशनमध्ये रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. गुन्ह्याचा तपास थंडावला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची जोखीम वाढली आहे. गेल्या वीस महिन्यांपासून वरिष्ठांकडे सातत्याने मागणी करीत आहे. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. ही रिक्त भरली तर गुन्हेगारी रोखण्यात यश येईल.
– राजू मोरे, पोलीस निरीक्षक, भोर.
==============================