पुणे -पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या प्रवेश फेरीची कार्यवाही रविवार (दि.20) पासून सुरु होणार आहे. अकरावीच्या नियमित प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
304 कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 1 लाख 7 हजार 30 जागा दर्शविण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1 लाख 1 हजार 459 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यातील 85 हजार 154 विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन लॉक’ केले आहे.
84 हजार 893 अर्जांची पडताळणी केली आहे. 77 हजार 222 विद्यार्थ्यांनी पसंती क्रम नोंदविले आहेत. 45 हजार 448 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून 61 हजार 582 इतक्या प्रवेशाच्या जागा रिक्तच पडलेल्या आहेत.