मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले असल्याचे म्हटले जात आहे.
या कारवाईवर काँग्रेसनं भूमिका मांडत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत
भाजपाचा एकही उमेदवार यांना सापडू नये? ज्यांना विरोधी पक्षात असताना चोर म्हणतात ते भाजपात गेल्यावर पवित्र कसे होतात? भाजपाने लोकशाही संकटात आणली आहे हे जनतेने ओळखावं. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही मविआ सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राचा भाग आहे. पण आम्ही एक आहोत!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 24, 2020
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे.
हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा; राऊतांचे भाजपला आव्हान
सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.