बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिनी चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याने आपल्या आगामी “धमाका’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन हा सूटमध्ये लांब केस आणि वाढलेल्या दाढीत खूपच देखणा दिसून येते आहे. यासोबत त्याने स्पेक्सही घातलेले आहे.
View this post on Instagram
कार्तिकने पोस्टर शेअर करत पोस्ट केले की, “आज माझा वाढदिवस आहे… धमाका झाला पाहिजे.’ या चित्रपटचे दिग्दर्शन राम माधवानी करणार असून कार्तिक आर्यन हा इंटेंस रोलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे निर्माता हा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित करण्याची आतापासून तयारी करत आहे. या चित्रपटाला रोनी स्क्रूवाला, अमित माधवानी आणि राम माधवानी हे को-प्रोड्यूस करत आहेत.
View this post on Instagram
हा चित्रपट साउथ कोरियन “द टेरर लाइव’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट थ्रिलर असून यात कार्तिक आर्यनशिवाय कोण-कोण भूमिका साकारणार आहेत, हे अद्याप अनिश्चित आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास लॉकडाऊनपूर्वी कार्तिक आर्यन हा “भुलभुलैया-2′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. याशिवाय कार्तिकने जान्हवी कपूरसोबच्या “दोस्ताना-2’चेही शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे.