नगर – जिल्ह्यात आज 755 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 40 हजार 317 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.54 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 597 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3982 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 73, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 110 आणि अँटीजेन चाचणीत 414 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 20, अकोले 5, जामखेड 6, कर्जत 1, नगर ग्रामीण 5, पारनेर 2, राहुरी 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 15, कॅन्टोन्मेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 110 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 42, अकोले 2, जामखेड 6, कर्जत 1, कोपरगाव 1, नगर
ग्रामीण 14, नेवासा 5, पारनेर 8, पाथर्डी 6, राहाता 5, राहुरी 5, संगमनेर 9, शेवगाव 2, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 414 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 31, अकोले 15, जामखेड 51, कर्जत 40, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 22, नेवासा 35, पारनेर 28, पाथर्डी 33, राहाता 14, राहुरी 19, संगमनेर 36, शेवगाव 33, श्रीगोंदा 16,, श्रीरामपूर 29 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 755 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 163, अकोले 45, जामखेड 35, कर्जत 49, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 38, नेवासा 27, पारनेर 29, पाथर्डी 61, राहाता 45, राहुरी 37, संगमनेर 81, शेवगाव 14, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट 7, मिलिटरी हॉस्पिटल 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.