नवी दिल्ली – 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता झाली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्युरी मेंबर्सनी ही घोषणा केली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीपासून सर्वोत्कृष्ट चित्रपटापर्यंत अनेक पुरस्कार श्रेणीतील विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रिती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत. तर अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे.
कोणाला मिळाले पुरस्कार वाचा संपूर्ण यादी….
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)