ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत आतापर्यंत 83 जणांना करोनाची लागण झाली असून 62 जण करोनावर मात करीत घरी परतले आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून 16 जणांवर उपचार सुरू आहेत. तर तिघांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
शहराप्रमाणे ग्रामीण भागात करोनाने हातपाय पसरले आहेत. तालुक्यातील संख्या दररोज वाढते आहे. 500च्यावर रुग्ण संख्या गेली आहे. तरी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले जात आहे.