5A Side Football Tournament – इंग्लंड हे फुटबॉलचा माहेरघर समजले जाते आणि तेथील मँचेस्टर युनायटेड क्लबच्या मैदानावर फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली तर याहून दुसरे स्वप्नच नाही. हे स्वप्न साकार करण्याची संधी अग्रगण्य टायर निर्माता अपोलो टायर्सने आज रोड टू ओल्ड ट्रॅफर्ड उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्ती द्वारे मिळणार आहे.
अपोलो टायर्सने दुसरी आवृत्ती सुरू केल्याची घोषणा केली. मँचेस्टर युनायटेड द्वारे समर्थित अनोखी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून पुण्याच्या फेरीला येत्या रविवारपासून प्रारंभ होणार आहे. हॉटफुट, बावधन येथील मैदानावर ही फेरी सुरू होईल.
अपोलो टायर्सच्या या उपक्रमाद्वारे प्रतिभावान फुटबॉलपटूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून मँचेस्टर युनायटेड च्या मैदानावर अन्य खेळाडूंसमवेत फुटबॉल चा अनुभव मिळणार आहे. हे खेळाडू सहसा इंग्लंड मधील प्रवास आणि दीर्घ वारसा ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळण्याची अतुलनीय आणि आयुष्यात एकदाच संधी मिळवतील.
जागतिक विजेते निवडण्यासाठी अपोलो टायर्सचा रोड टू ओल्ड ट्रॅफर्डची दिमाखदार अंतिम फेरी ३१ मे रोजी आयकॉनिक स्टेडियममध्ये होणार आहे. ही स्पर्धा मोठ्या स्वरुपात परत येत आहे आणि ती दिल्ली, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि कोची या सहा शहरांमध्ये होणार आहे. ज्यामध्ये चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत सर्व शहरांमधील साखळी विजेते एकमेकांना सामोरे जातील.