पणजी – इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीने विजय मिळवताना अव्वल स्थानावरील पकड अधिक घट्ट केली. बेंगळुरू एफसीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 2-1 असा विजय मिळवताना 29 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.
या सामन्यात हैदराबादने पहिल्या हाफमध्येच दोन गोल करून वर्चस्व गाजवले होते. झेव्हियर सिव्हेइरो ( 16 मि.) व जाओ व्हिक्टर ( 30 मि. ) यांनी हे गोल केले. मध्यंतरानंतर त्यांना बेंगळुरूने गोल करण्यापासून रोखले. पण, बेंगळुरूलाही बरोबरीचा गोल करता आला नाही. त्यांच्याकडून सुनील छेत्रीने 87व्या मिनिटाला एकमेव गोल केला आणि तो विक्रमी ठरला.
आयएसएलमध्ये 50 गोल करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. आयएसएलच्या इतिहासात 50 गोल करणारा छेत्री हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने बार्थो ऑग्बेचेला ( 49) मागे टाकले.