पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभागीय समिती व नेस वाडिया कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे शहर आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत पूना कॉलेजने विद्याभवन महाविद्यालयास 11-10 ने नमवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या पारितोषिक प्रसंगी पुणे शहर समिती उपाध्यक्ष रवी पाखरे, डॉ. आयाज शेख, आयोजक सचिव मिथुन त्रिभवन, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, नेस वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, पुणे शहर विभागीय क्रीडा समिती सचिव मनीषा कोंढरे, प्रा. आशद शेख, प्रा. इम्रान पठाण, प्रशिक्षक सोहेल शेख उपस्थित होते.
पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, उपप्राचार्य इक्बाल शेख, उपप्राचार्य खान मोहिनुद्दीन यांनी खेळाडू तसेच शारीरिक शिक्षक क्रीडा संचालक डॉ. अयाज शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत उत्कृष्ट बचाव रक्षक सोहम कोरड, उत्कृष्ट गोलरक्षक शिवांश सिंग, उत्कृष्ट खेळाडू ओमकार नले, स्पर्धेचा टॉप स्कोरर प्रभुदा गायकवाड या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नौरोजी वाडिया कॉलेजने मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर यांचा 3-0 ने पराभव केला.