राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत तब्बल 57 व्यक्तीचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 16 झाली आहे. तालुक्याची करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 878 वर पोहचली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या वाढतच आहे. तालुक्यात लॉकडाऊनचे 10 दिवस पूर्ण झाले असताना करोनाची संख्या मात्र वाढली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढला आहे.
तालुक्यात मागील 24 तासात चाकण 4, आळंदी 13, राजगुरूनगर 11 अशा तीन नगर परिषदांमध्ये 28 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. ग्रामीण भागातील सांडभोरवाडी 1, सातकरस्थळ 4, राक्षेवाडी 1, होलेवाडी 1, शेलपिंपळ्गाव 2, काळूस एक, बहुळ 1, कुरुळी 1, खालूंब्रे 2, कान्हेवाडी 3, मेदनकरवाडी 1, नाणेकरवाडी 3, येलवडी 1, गुळाणी 1, दावडी 1, सायगाव 1, रौंधळवाडी 1, वाडा 3 या 18 गावातील 29 करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.