कोरेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांसाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांच्या कामांसाठी दिलेल्या प्रस्तावास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली आहे.
निगडी तर्फ सातारा, रुई (प्रत्येकी 30 लाख), धोंडेवाडी (तासगाव), कोडोली-सह्याद्री हिल (प्रत्येकी 20 लाख), धनगरवाडी (कोडोली), फडतरवाडी-माळीनगर, फडतरवाडी-नेर (प्रत्येकी 15 लाख), शिरढोण (35 लाख), जाधववाडी-तासगाव (तोरस्कर वस्ती), ललगुण येथे बंदिस्त गटारे (प्रत्येकी दहा लाख) पाटखळ येथे 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बोरखळ ग्रामपंचायत कार्यालय, विसापूर-बोबडेवाडी सभामंडप, तांदुळवाडी मोरी पुल, अंबवडे संमत वाघोली सभामंडप सुशोभिकरण, मोळ रामोशी वस्तीत पेव्हर ब्लॉक, व्यायामशाळा (प्रत्येकी 15 लाख), दरुज येथे खंडोबा सभामंडप, सातारारोड-पाडळी स्टेशनमधील मोतीचंदनगर येथे ड्रेनेज लाइन आणि इमारत दुरुस्ती (प्रत्येकी 20 लाख), राजापूर मारुती मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरण,
आसगाव मंदिर पत्र्याचा सभामंडप आणि सुशोभिकरण, खटावच्या शास्त्रीनगरमध्ये सभामंडप, एकसळ येथे जानाई मळाई मंदिरासमोर सभामंडप, पिंपोडे खुर्द रामोशी वस्तीत सभामंडप (प्रत्येकी 10 लाख), घाडगेवाडी, पांगरखेल येथे स्मशानभूमी, संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विक्रांतनगरलगत खुल्या जागेवर संरक्षक भिंत, फडतरवाडी-बुध स्मशानभूमी (प्रत्येकी 12 लाख),निगडी रंगनाथस्वामींची स्मशानभूमी (13 लाख), म्हसवे लमाण वस्तीतील सेवालाल मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी (पाच लाख), देगावमध्ये सिद्धनाथ सभामंडप व सुशोभिकरण (साडेबारा लाख), असा निधी मंजूर झाला आहे.
महात्मा फुले जन्मभूमीचा विकास
महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मभूमी कटगुण (ता. खटाव) येथील विकासकामांना ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला आहे. महात्मा फुले स्मारक सुशोभिकरण, शिंदे वस्तीत पेव्हर ब्लॉक, बंदिस्त गटार आणि सुशोभिकरणासाठी (प्रत्येकी 15 लाख) आणि जानुबाई मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्मशानभूमींचे प्रश्न मार्गी
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीअभावी गैरसोय होत असल्याने आमदार महेश शिंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय राखून, हा प्रश्न मार्गी लावला आहे. घाडगेवाडी, निगडी रंगनाथस्वामी, पांगरखेल, फडतरवाडी-बुध या गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यासाठी 61 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.