शिरूर : शिरूर तालुक्यातील 4 गावांमध्ये 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर रामलिंग येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यातील शिरूर शहर १, करंदी १, तळेगाव ढमढेरे 3, तर्डोबावाडी १, असे तालुक्यात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.
शिरूर शहरातील काल कोरोना तपासणीकरिता पाठवलेल्या 12 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर शहरातील भाजी बाजार येथे एक ५३ वर्ष पुरुुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. शहरातील दोघाजणांनी कोरोनावर मात करत पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. यामुळे शिरूर शहराला मोठा दिलासा मिळाला असून आजच्या दिवसात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाला आहे.
शिरूर शहरातील भाजी बाजार येथील 53 वर्षीय पुरुषाला कोरोना ची लागण झाली आहे. तर संभाजी नगर हुडको वसाहत येथील 55 वर्षीय पुरुषाने तर सैनिक सोसायटी येथील 36 वर्षीय वकिलाने ही कोरोनावर मात केली आहे. शहरातील डंबे नाला येथील मयत पुरुषाच्या घरातील नातेवाईक व सोनार येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईक, भाजीबाजार येथील करुणा पॉझिटिव पुरुषाचे नातेवाईक असे मिळून 12 जणांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. यामुळे शिरूर शहराला आजचा दिवस दिलासा देणार आहे.
शिरूर शहरात सैनिक सोसायटी, डंबे नाला कामाठीपुरा, शिवाजी हौसिंग सोसायटी, सुभाष चौक, सरदार पेठ, लाटे आळी, जोशीवाडी, प्रीतम प्रकाश नगर नगर ,भाजी बाजार, मुंबई बाजार, हुडको कॉलनी, श्री हाइट्स, सय्यद नगर , कुंभार आळी, रेव्हेन्यु कॉलनी , बुरुडआळी या भागात २६ ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने प्रादुर्भाव थांबवण्याच्या दृष्टिकोनातून नगरपरिषदेच्या वतीने प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी नियमाचे पालन करून काळजी घेण्याचे आव्हान शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.