कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 4 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.
सदरच्या मोहिमेचा 65 वा रविवार असून या अभियानामध्ये जेष्ट नागरिक, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे व कार्यकर्ते, आम आदमी अध्यक्ष संदिप देसाई, उपाध्यक्ष उत्तम पाटील, आदम शेख, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, मोईन मोकाशी, प्रेम कदम, सुरज सर्वे, संतोष घाटगे व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी कारगिल शौर्य दिनानिमीत्त उद्यमनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच टाकाळा येथील राजाराम उद्यान मध्ये अत्यंत दुर्मिळ आणी औषधी वनस्पतींचे वक्षारोपण केले. या वृक्षारोपनामध्ये प्रामुख्याने करमाळा, मोह, अंजनी, दीक्षा, रिठा, पांढरी सावर, भद्राक्ष, कुंकू फळ, अंजीर अशा झाडांचा समावेश होता. वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे, अक्षय कांबळे, अमित यादव, संदीप देसाई, उदय पोतदार, प्रमोद गुरव व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी आरोग्य विभाकडील कर्मचारी यांना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
याचबरोबर कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुध्द ठेवणारी विषारी वायू शोषून घेणा-या झाडांचे वृक्षारोपन केले. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, प्रणव कागले, सरफराज पिद्या, पियुष हलस्वार व कार्यकर्ते, विभागीय आरोग्य निरिक्षक निखील पाडळकर, किटकनाशक अधिकारी स्वप्नील उलपे, आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांनी झूम प्रकल्प येथेही वृक्षारोपन कार्यक्रमात सहभाग घेतला.
याचबरोबर जयंती नदी संप व पंप हाऊस परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी तेथे
विषारी वायू शोषून घेणा-या झाडांचे ट्रॉफिक पोलीस ए.व्ही. हवालदार, ए.के.दळवी, टी.एन.नागोरे, एन.एम.टिपूगडे यांच्या हस्ते वृक्षारोपन केले. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, शाखा अभियंता आर.के.पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
सदरची स्वच्छता मोहिम पंचगंगा नदी घाट व पंचगंगा स्मशानभूमी, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज मेनरोड, हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क, रंकाळा टॉवर ते डी मार्ट मेनरोड, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव मेनरोड, रिलायन्स मॉल मागील बाजू जयंती नदी, धैर्यप्रसाद हॉल ते कावळा नाका ते मध्यवर्ती बसस्थानक, सर्किट हाऊस ते कसबा बावडा तसेच क्रशर चौक ते सानेगुरुजी बसस्टॉप याठिकाणी फुटपाथ व रोडचीही स्वच्छता करण्यात आली.
आयुक्त डॉ.मल्लिन्नाथ कलशेट्टी यांनी धैर्यप्रसाद हॉल येथे दुकानदार यांना कोरोनाबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, मास्कचा वापर करावा, सर्वांनी वारंवार हात स्वच्छ साबनाने धुवावे, गर्दीमध्ये जाऊ नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन स्वच्छता मोहिमेच्या वेळी करण्यात आले. या मोहिमेत 3 जेसीबी, 6 डंपर, 6 आरसी गाडया, 4 औषध फवारणी टँकर, 1 वॉटर टँकर, 1 स्वच्छता रथ वापर करण्यात आली. तसेच महापालिकेच्या 90 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.