पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेच्या सुसज्जतेकडे भर दिला असून यासाठी महापौर विकास निधी आणि आरोग्य निधीतून 4 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यातून दोन रुग्णवाहिकांची खरेदी यातून तातडीने होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महापौर विकास निधीतून 2 हजार 500 पीपीई किट्स, 8 स्वाब बूथ, 100 इन्फ्रारेड थर्मामीटर आणि 9 हजार 200 एन. 95 मास्क खरेदी केले जाणार आहेत. आरोग्य निधीतून 2 रुग्णवाहिका आणि थर्मल स्कॅनर बसवण्यात येणार आहेत, असेही मोहोळ यांनी सांगितले.