पिंपरी : चऱ्होली परिसरात करोनाचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोना बाधितांची संख्या ४० वर पोचली आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शनिवारी (दि. १७) शहरातील दिघी आणि भोसरी परिसरात चार करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आणखी दोघे जण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये चऱ्होली येथे राहणारे ४३ वर्षीय पुरुष आणि ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सध्या पिंपरी चिंचवड शहरात ३६ करोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर अन्य चार जणांवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत १३ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ५४ गेली आहे.