kutimb

अकोल्यात एकाच दिवसात 342 कोव्हिड-पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू; जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातही संसर्ग

अकोला – कोरोनाचा संसर्ग आकोला जिल्ह्यात अत्यंत भयावह वेगात पसरत असून रविवारी, २१ फेब्रुवारीला एकाच दिवसात तब्बल ३४२ रुग्ण आढळल्याने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हादरा ठरला आहे. संपूर्ण शहराला विळखा घातलेला कोरोना विषाणू जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पसरत असल्याने परिस्थितीत हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांचा आकडा १३९३५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११५८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १९९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सायंकाळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरामधील विविध भागागील रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरातील ३२५ रॅपिड चाचण्यांमधून ५४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अकोट येथील सात, बार्शीटाकळीतील चार, तेल्हारा येथील आठ, मूर्तिजापूर येथील सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५, हेडगेवार लॅब येथून १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या ८८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारीला दाखल करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.