वाघोली -येथील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ग्रामपंचायत निधीमधून 30 लाख 23 हजार रुपयांच्या अंतर्गत गटार, शौचालय आदी विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. बाळासाहेब जगताप यांचे घर ते आव्हळवाडी रस्ता अंतर्गत गटार (7 लाख 45 हजार), भाडळे वस्ती शाळा संरक्षक भिंत, किचन शेड व शौचालय बांधणे (22 लाख 78 हजार) विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना कटके, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, महेंद्र भाडळे, पूजा भाडळे, वंदना दाभाडे, सुधीर भाडळे, जयप्रकाश सातव, माजी उपसरपंच समीर भाडळे, कैलास सातव, दत्तात्रय कटके, महादेव कोलते, जयसिंग भाडळे, प्रमोद भाडळे, संतोष सातव उपस्थित होते. उर्वरित कामे सरपंच वसुंधरा उबाळे व रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावणार असल्याचे भाडळे यांनी सांगितले.