अमरावती – अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी पोलीस स्थानकासमोर नाकाबंदी दरम्यान एका मालवाहू ट्रकमधून 3 क्विंटल पेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. यात जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद फारूक (वय 25), सलीम मुल्ला मुजफ्फर मुल्ला (वय 35), शेख सोयब शेख हसन (वय 25) आणि अनुज नवजिरे (सर्व रा. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हैदराबादच्या निजामाबाद येथून अमरावती शहरातून गांजा घेऊन ट्रक जात असल्याची माहिती वलगाव पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी 3 क्विंटल गांजा जप्त करत ट्रकही ताब्यात घेतला आहे.
यात जवळपास 33 लाखांचा गांजा व 12 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा परतवाडा येथे नेला जात होता. सदर कारवाई वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.