पुणे – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15 मे) पाषाण-सुसगाव रोडवरील सनीज वर्ल्ड याठिकाणी महासत्संग मेळावा संपन्न होत आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर हे व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, कृषि विकास, सांप्रदायिक, बालसंस्कार अश्या विविध विनामूल्य यशस्वी उपक्रमांसह दिंडोरी येथून सुरु झालेला सामाजिक विकासाचा हा राजमार्ग आता हजारों सेवाकेन्द्रांच्या माध्यमातुन विश्वशांतीचा संदेश देत आहे. गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सात हजाराहून अधिक सेवा केंद्र भारतात आणि परदेशात कार्यरत आहे.
गेली ४५ वर्षे “ग्राम आणि नागरी विकास अभियान” च्या माध्यमातून समाजातील दु:खी पिडीत लोकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पशु व गौवंश संवर्धन, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, कायदा जागरूकता, आरोग्य आणि आयुर्वेद, आयटी विभाग, प्रशिक्षण विभाग, देश विदेश अभियान विभाग, आणि प्रशासकीय विभाग यांचा समावेश आहे.