IPL 2024 (DC vs LSG Match 64, Toss Update) : आज आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यास थोड्याच वेळात म्हणजे 7.30 वाजता सुरूवात होईल.
दिल्लीसाठी हा ‘करो या मरो’ चा सामना आहे. जर संघ हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचबरोबर नेट रनरेट सकारात्मक करण्यासाठी दिल्ली संघाला केवळ जिंकावे लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दिल्ली आणि लखनौचे प्रत्येकी 12 गुण आहेत. दिल्लीचा हा 14वा सामना आहे, तर लखनौचा 13वा सामना आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lucknow Super Giants elect to field against Delhi Capitals) त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to field against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/dxf8kBgKIf
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
राहुलने सांगितले की, युधवीर सिंग चरक आणि अर्शद खान संघात परतले आहेत. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, त्याच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल आहेत. कुमार कुशाग्रच्या जागी पंतचे पुनरागमन झाले आहे. बंदीमुळे तो शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरच्या जागी गुलबदिन नायबचे संघात पुनरागमन झाले आहे.
DC vs LSG : दोन्ही संघाचं प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान. (इम्पॅक्ट सब : एम सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम)
दिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद. ( इम्पॅक्ट सब : इशांत शर्मा, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, स्वस्तिक चिकारा, ललित यादव)
लखनौ-दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड
लखनौ आणि दिल्ली यांच्यातील मागील चार सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर लखनौने 3 सामने जिंकले आहेत. म्हणजे लखनौचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीचे सामने गमावले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला एक दिवस आधी आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, लखनौचा शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभव केला होता.