T20 World Cup 2024 & Team India – आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अद्यापही भारताचे बहुतांश खेळाडू हे इंडियन प्रिमिअरा लीग खेळण्यात व्यग्र आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु व्हायला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना, भारतीय संघ सराव करणार कधी आणि सामन्यागणिकची रणनीती ठरवणार कधी, असा प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकणे भारतासाठी दुरापस्त असेल, असे भाकित ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी याने वर्तवले आहे.
आगामी विश्वचषक स्पर्धा अमेरिकेसह वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. तेथील नव्या मैदानांचा कसलाही अनुभव कोणाकडेही नाही. असे असताना सरावाला जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे. मात्र, भारतीय खेळाडू अद्यापही आयपीएलच्या आकर्षणातून बाहेर येण्यास तयार नाहीत,तासे सांगून मूडी म्हणाला की, इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएलवर पाणी सोडले, ते योग्यच केले आहे.
टॉम मूडी म्हणाले की, अमेरिकेत काय परिस्थिती असेल हे अजून समजलेले नाही. तेथे ड्रॉप-इन खेळपट्ट्या असतील. ते वेगवान आणि उसळत्या असतील किंवा फिरकीला सपोर्ट करतील की संथ असतील हे अद्याप माहित नाही. कोणत्या खेळपट्ट्या कोणत्या संघाला शोभतील हे समजून घेतले पाहिजे.
भारत गटातील सर्व सामने अमेरिकेत खेळणार आहे. अ गटात त्यांचा सामना आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडाशी होणार आहे. भारतीय संघ यापुढे पात्र ठरल्यास बाद फेरीसाठी त्यांना कॅरेबियन देशात जावे लागेल. मात्र, तेथील परिस्थिती भारतीय संघासाठी परिचित असेल.