पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज दिवसभरात विविध भागांत करोनाचे 26 रुग्ण आढळून आले, त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 160 झाली आहे, तर 41 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप जठार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.
मुळशी तालुक्यात विविध भागांत आज दिवसभरात करोनाचे 26 रुग्ण आढळून आले. यामध्ये 16 पुरुष, तर 10 महिलांचा समावेश आहे. बावधनमध्ये दोन, हिंजवडी येथे एक, नांदेत चार, मारुंजीत दोन, पौडमध्ये तीन, चालेत एक, मारणेवाडीत एक, घोटवडेत दोन, भूगावमध्ये दोन, सुसमध्ये तीन, कासारआंबोलीत एक, सुतारवाडीत दोन, माणमध्ये दोन रुग्ण सापडले आहे.
मंगळवारी (दि. 7) मुळशीत 22 रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत तालुक्यात रुग्णसंख्या 160 झाली आहे. यापैकी 41 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार व आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.