मुंबई – विनोदी भूमिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने येथील राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
दरम्यान, दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरातील के. सिया कब्रस्थानमध्ये सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास जगदीप यांना सुपुर्द-ए-खाक केलं जाईल. सध्या त्यांचा सोशल मीडियावर थ्रो बॅक व्हिडियो चांगलाच वायरल होत आहे.
इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडियोमध्ये गंमतीशीर डॉयलॉग जगदीप यांनी या व्हिडीओमध्ये म्हंटला आहे. “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते. हमारा नाम भी सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है. अब आप समझ लो.” त्यांचा हा थ्रोबॅक व्हिडीओमधील डॉयलॉग सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.