चिंबळी – सामाजिक बांधीलकी आणि माणुसकीचे नाते टिकावे या उद्देशाने रोज 100 लोकांना घरपोच जेवण तयार करण्यासाठी मोई येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवीदास मेदनकर यांनी 21 हजारांची रोख देणगी सरपंच राहुल गवारी यांच्याकडे सुपूर्द केली,
तसेच भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुुख गोरख गवारी यांनी मुख्यमंत्री साहता निधी म्हणून 11 हजार रुपये पंचायत समितीच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला असल्याचे शिवसेना किरण गवारे यांनी सांगितले.
यावेळी मारुती येळवंडे, आनंद गवारे, रवी गवारे, मोहन गवारे, संतोष गवारे, संजय गवारे उपस्थित होते.