नवी दिल्ली – देशात निर्माण झालेले करोनाचे आव्हान मोठे असले तरी त्या आव्हानातून आपल्याला संधी शोधायला हवी. या पार्श्वभूमीवर या संकटातून बाहेर येण्याचे मार्ग शोधण्यासाठी आपण देशातील वैज्ञानिक, अभियंते आणि डाटा एक्स्पर्टस यांना एकत्रितपणे काम करायला प्रेरीत केले पाहिजे अशी सूचना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
करोनासारख्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व त्यावर वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी आपण देशात मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले वैज्ञानिक, अभियंते आणि डाटा एक्स्पर्टस यांना प्रेरणा दिली पाहिजे असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे. गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी लॉकडाऊन हा करोनावरील उपाय नाही तर तो केवळ एक पॉझ आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेऊनच आपल्याला त्यावर मात करावी लागेल असे म्हटले होते.