India vs South Africa 1st T20 2023 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (10 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. उभय संघांमधील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर 7.30 वाजता सुरू होणार आहे. भारताचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे.
डर्बनमध्ये सतत पाऊस पडत आहे. किंग्समीड स्टेडियमची खेळपट्टी कव्हरने झाकण्यात आली आहे. डर्बनमध्ये अजूनही पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे टाॅसला विलंब होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टाॅस(Toss) होणार होता, पण आता पावसामुळे उशीर होणार आहे.
Hello and welcome to our coverage of the three-match T20I series in South Africa. The Kingsmead is currently under covers. ⛈️☔ #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/5uolod2qYZ
— BCCI (@BCCI) December 10, 2023
टीम इंडियाची कमान सूर्यकुमारवर…
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. आता युवा संघ सलग दुसरी टी-20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ प्रोटीयाविरुद्ध (दक्षिण आफ्रिका) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आणि वनडे मालिकेत अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.
डर्बनमध्ये भारताचा रेकॉर्ड चांगला
टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 टी-20 सामने खेळले असून या कालावधीत 5 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाला दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. हा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. या दौऱ्यातील एक सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
यावेळी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये पहिला सामना खेळणार आहे. भारताचा येथेही रेकॉर्ड चांगला राहिला आहे. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनमध्ये खेळला होता. तो 37 धावांनी जिंकला होता. त्यानंतर जानेवारी 2011 मध्ये दुसरा सामना झाला. हा देखील 21 धावांनी जिंकला होता. डिसेंबर 2006 मध्ये भारताने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. त्याही सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता.