India Vs South Africa 1st T20 Pitch Report and Match Prediction : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने होणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-20 सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. खेळपट्टीही खूपच संथ आहे. या सामन्यात दवाचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
गिल आणि जैस्वाल सलामीला…
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल पहिल्या T20 मध्ये डावाची सुरुवात करू शकतात. वास्तविक, डाव्या आणि उजव्या हाताच्या संयोजनामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळेल. यानंतर रिंकू सिंग, जितेश शर्मा आणि रवींद्र जडेजा दिसू शकतात. गोलंदाजी विभागात रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार दिसू शकतात.
दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी कमकुवत..
लुंगी नगिडी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर आहे. तर कागिसो रबाडा आणि अॅनरिक नॉर्टजे हे या मालिकेचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत गेराल्ड कोएत्झी, अँडिले फेहलुक्वायो आणि नांद्रे बर्जर पहिल्या टी-20मध्ये खेळताना दिसू शकतात. हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि कर्णधार एडन मार्कराम फलंदाजीत आहेत.
मॅच प्रिडिक्शन….
भारत आणि दक्षिण आफ्रिका अनेक नवीन खेळाडूंसह टी-20 मालिकेत उतरणार आहेत. अशा परिस्थितीत ही स्पर्धा खूपच रोमांचक होऊ शकते. मात्र, आमच्या मॅच प्रिडिक्शन मीटरमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा (वर्चस्व) दिसत असला तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत आहे. अशा परिस्थितीत त्यांना फायदाही होईल.
दक्षिण आफ्रिकेचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मुकेश कुमार/दीपक चहर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.