#NZvBAN 1st T20I ,Bangladesh Historic Win : बांगलादेशने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आश्चर्यजनक कामगिरी केली आहे. बांगलादेशने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच T20 सामन्यात शानदार विजय नोंदवला आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशी संघाने किवीजचा 5 गडी राखून पराभव केला. बांगलादेशने टी-20 सामन्यात न्यूझीलंड संघास त्याच्यांच घरच्या मैदानावर(न्यूझीलंडमध्ये) पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक विजयाचा हिरो होता मेहदी हसन. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने बांगलादेश संघाला विजयापर्यंत नेले. मेहदी हसन याने फलंदाजीत 16 चेंडूत नाबाद 19 धावांची खेळी केली तर गोलंदाजीत 14 धावा देताना 2 गडी बाद केले.
Bangladesh Tour of New Zealand
Bangladesh 🆚 New Zealand | 1st T20IPlayer of the Match:
Shak Mahedi Hasan (Bangladesh) | 2/14 Wickets & 19*(16) Runs#BCB | #Cricket | #NZvBAN pic.twitter.com/f64stJ34Qf— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 27, 2023
नेपियर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. येथे न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या एका धावेवर किवी संघाच्या तीन विकेट पडल्या. मेहदी हसनने पहिल्याच षटकात टीम सेफर्टला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पुढच्याच षटकात शोरीफुल इस्लामने फिन ऍलन (1) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना बॅक टू बॅक बॉलमध्ये बाद केले.
नीशमच्या खेळीने उभारील सन्मानजनक धावसंख्या…
या खराब सुरुवातीनंतर डॅरिल मिचेल (14) आणि मार्क चॅपमन (19) यांनी न्यूझीलंडला काही प्रमाणात डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. यानंतर जेम्स नीशमने 29 चेंडूत 48 धावा करत किवी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्याला मिचेल सँटनर (23) आणि अॅडम मिल्ने (16) यांनीही चांगली साथ दिली. अशाप्रकारे, निर्धारित 20 षटकांत न्यूझीलंड संघाला 9 गडी गमावून 134 धावा करता आल्या.
बांगलादेशकडून शोरीफुल इस्लामने सर्वाधिक तीन, मेहदी हसन आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी दोन आणि तंजीम आणि रिशादने प्रत्येकी एक गडी बाद केला.
Bangladesh Tour of New Zealand
Bangladesh 🆚New Zealand | 1st T20IBangladesh won by 5 wickets & led the series 1-0👏 🇧🇩#BCB | #Cricket | #NZvBAN pic.twitter.com/WrCB7QfCBJ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 27, 2023
लिटन दासची विजयी खेळी…
135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने एकूण 13 धावांत रॉनी तालुकदार (10)ची विकेट गमावली. संघाची धावसंख्या 38 असताना कर्णधार शांतो (19) देखील बाद झाला. बांगलादेशने ठराविक अंतराने विकेट गमावल्या परंतु लक्ष्याकडे सातत्याने वाटचाल सुरू ठेवली. बांगलादेशनं संघाची धावसंख्या 67 असताना सौम्या सरकार (22) तर 96 धावसंख्या असताना तौहीद हद्दूय (19) यांची विकेट गमावली त्यानंतर लगेचच म्हणजे धावसंख्या 97 असताना अफिफ हुसेन 1 धाव करत माघारी परतला.
97 धावांवर 5 विकेट पडल्यानंतर सामन्यात थोडा उत्साह निर्माण झाला होता, परंतु येथून मेहदी हसनने 16 चेंडूत 19 धावांची खेळी केली आणि सलामीवीर लिटन दास (42) याला चांगली साथ दिली आणि सहाव्या विकेटसाठी दोघांनी मिळून नाबाद 40 धावांची भागीदारी करून बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.