मोहाली – मोहालीच्या जिरकपूरमध्ये एका कुत्र्याने रस्त्यावर खेळणाऱ्या मुलाच्या गुप्तांगाला चावा घेतला. ज्यात बालक गंभीर जखमी झाले. मन्नत एन्क्लेव्ह फेज-२ मध्ये राहणारा ५ वर्षीय अंगम अवस्थी असे या मुलाचे नाव आहे. त्याला गंभीर अवस्थेत चंदीगड पीजीआयमध्ये पाठवण्यात आले आहे.
आकर्ष अवस्थी यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अंगम अवस्थी हा रस्त्यावर खेळत होता. तेव्हा कॉलनीत फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याचे गुप्तांग फाडले.
यानंतर आरडाओरडचा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले. अंगमला प्रथम स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पीजीआयमध्ये पाठवण्यात आले. १५ डिसेंबर रोजी अंगमच्या ऑपरेशनचे नियोजन सुरू आहे.
मोहालीमध्ये २ आठवड्यात कुत्र्यांनी २० लोकांना चावा घेतला आहे. जखमींमध्ये आशिष (वय-२५), ओम तिवारी (१४), मुन्नी देवी (३०), अरुण (२८) आदींचा समावेश आहे. कुत्रा चावण्याच्या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी नगर परिषदेकडे कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली, मात्र त्यांचे कोणीही ऐकले नाही.
लोकांमध्ये घबराटीचे वातावरण
कुत्रा चावण्याच्या घटनेनंतर स्थानिक लोक भयभीत झाले असून घराबाहेर पडण्यास घाबरले आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, बळींची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. हे असेच लोक आहेत जे सरकारी दवाखान्यात गेले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या यात समाविष्ट नाही.