SA vs IND 1st T20 Durban Weather Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याचा उत्साह पावसामुळे बिघडू शकतो. खरं तर, आज दक्षिण आफ्रिकेच्या शहरात आणि ज्या वेळी हा सामना सुरू होणार आहे, त्या वेळेत पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. आज (१० डिसेंबर) डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये टी-२० सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल पण दक्षिण आफ्रिकेत तो 4 वाजता असेल. डर्बनमधील हवामान अंदाजानुसार, संध्याकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. रात्रीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ पावसामुळे आजच्या सामन्यातील मजा खराब होऊ शकते.
सामन्यादरम्यान डर्बनमध्ये तापमान 20 अंशांच्या आसपास असेल. येथे दवबिंदू (ड्यू पॉइंट) 17 अंश आहे, म्हणजे या पेक्षा तापमान कमी झाल्यास मैदानावर दवबिंदू पडण्याची शक्यता असते. मात्र, आज तापमान इतके कमी राहण्याची शक्यता नाही. सामन्यादरम्यान हवेत भरपूर आर्द्रता असणार आहे.
टीम इंडियाची कमान सूर्यकुमारवर…
टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ प्रोटीयाविरुद्ध (दक्षिण आफ्रिका) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आणि वनडे मालिकेत अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.